Google Chromeचा वापर करणाऱ्यांसाठी Googleची ‘वॉर्निंग’


2 अब्जहून अधिक क्रोम युजर्सना गुगलने ब्राउजर अपडेट करण्याची सूचना केली असून दोन धोकादायक ‘बग’ सध्याच्या क्रोम ब्राउजरमध्ये असल्यामुळे क्रोम अपडेट करण्यास गुगलकडून सांगण्यात आले आहे.

ब्राउजरमध्ये दोन मोठ्या उणीवा असल्याचे एका सायबर सिक्युरिटी फर्मने निदर्शनास आणून दिल्यानंतर युजर्सना ब्राउजर अपडेट करण्याच्या सूचना कंपनीने दिल्या आहेत. कंपनीने संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून विंडोज, मॅक आणि लायनक्स प्लॅटफॉर्मवरील क्रोम युजर्सना ब्राउजर अपडेट करण्यास सांगितले आहे. युजर्सना 81.0.4044.129 हे क्रोमचे नवीन व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 81.0.4044.129 हे क्रोमचे नवीन व्हर्जन येत्या काही दिवसांमध्ये युजर्सच्या सिस्टिममध्ये ऑटोमॅटिकली इंस्टॉल केले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम या धोक्याबाबत माहिती Qihoo 360 चे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट झे जिन (Zhe Jin) यांनी दिली होती. use after free मेमरीशी निगडीत CVE-2020-6462 आणि CVE-2020-6461 नावाचे हे दोन बग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment