खूशखबर! विना अनुदानित घरगुती सिलेंडर 162.5 रुपयांनी स्वस्त


मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील तेल विपणन कंपन्यांनी विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली असून त्यानुसार 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलेंडर 162. 5 रुपयांनी स्वस्त झाला आहेत. या नवीन सिलेंडरची दिल्लीत किंमत 581.50 रुपये झाली आहे. त्याच वेळी 19 किलो वजनाचा सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला आहे. देशातील नागरिकांना मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच इंधन आणि भाज्यांचे दर लॉकडाऊनमध्ये वाढत असताना सिलेंडर स्वस्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपल्या वेबसाईटवर आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचे दर 744 वरून 581 वर आले आहेत. तर कोलकातामध्ये हे दर 584.50, मुंबईत 579.00 तर चेन्नईत 569.50 रुपये झाले आहेत.

19 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे आता गृहिणींना आपले घरचे बजेट बसवणे सोपे जाणार आहे. हा सिलेंडर याआधी 1285.50 रुपयांना मिळत होता, तो 1029.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 978.00, चेन्नईत 1144.50 रुपयांना नागरिकांना हा घरगुती सिलेंडर उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment