कोरोना : आता गावोगावी, घरोघरी होणार तपासणी

कोरोना व्हायरसची लढाई आता दुसऱ्या टप्प्यात पोहचली असून, केंद्र सरकारने पुढील लढाईसाठी योजना तयार केली आहे. पुढील टप्प्यात छोटी शहर, सोसायटी आणि गावांमध्ये संक्रमित व्यक्तीची ओळख पटवून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या उपचारापासून ते व्यवस्थेपर्यंत पर्याप्त सुविधा उपलब्ध केल्या जातील.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गावागावात कंटेनेमेंट झोनची ओळख केली जाईल आणि स्पेशल टीम घरोघरी जाऊन तपासणी करतील.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आता लढाई चेन ऑफ ट्रांसमिशन रोखण्याची आहे. यासाठी प्रत्येक संशयित संक्रमित आणि त्यांच्या संपर्कात कोण आले याचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान चालवले जाईल.

अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्त कोणत्या भागात आहेत त्याचे विश्लेषण केले जाईल. विशिष्ट रणनितीद्वारे तेथे कंटेनमेंट झोन घोषित केले जाईल. यात कॉलनी, मोहल्ला, महानगरपालिका प्रभाग, पोलिस स्टेशन क्षेत्र, महानगरपालिका क्षेत्र किंवा संपूर्ण शहर येऊ शकते.

याशिवाय ग्रामीण भागात काही गावांचा समूह, स्टेशन क्षेत्र, ग्राम पंचायत अशा प्रकारच्या भागांना कंटेनमेंट झोन घोषित केले जाईल. कंटेनमेंट भागात बफर झोन बनवावे लागेल, ज्याद्वारे भागातील हालचालींवर लक्ष ठेवता येईल.

त्यांनी सांगितले की, स्पेशल केसची विशेष तपासणी होईल. इन्फुएंजा, श्वसनासंबंधी आजारांची लक्षण असणाऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. त्यांचे सँपलिंग करून सर्व कॉन्टॅक्ट ट्रेस करावे लागतील व त्यांचे क्लिनिक ट्रायल होईल.

Leave a Comment