आरोग्य संघटनेला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरसवरून चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) निशाणा साधला आहे. डब्ल्यूएचओला यासाठी लाज वाटायला हवी, डब्ल्यूएचओ चीनच्या पीआर एजेंसी सारखे काम करत असल्याचे, ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासनाने कोरोना व्हायरसच्या प्रसारामध्ये डब्ल्यूएचओची काय भूमिका आहे, याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच संस्थेचा निधी देखील काही काळासाठी थांबवला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की डब्ल्यूएचओला लाज वाटायला हवी. कारण ते चीनची पीआर एजेंसी असल्यासारखे काम करत आहे.

यावेळी ट्रम्प यांनी आठवण करून दिली की, अमेरिका डब्ल्यूएचओला वर्षाला जवळपास 500 मिलियन डॉलर निधी देते. तर चीन 38 मिलियन डॉलर निधी देते. जगभरात हजारो लोक मरत असताना, डब्ल्यूएचओने कारणे सांगायला नको आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

Leave a Comment