1 मे पासून भारतात अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये पेंशन, एटीएम, रेल्वे, एयरलाईन्स, गॅस सिलेंडर, बचत खात्यावरील व्याज आणि डिजिटल वॉलेटच्या नियमांचा समावेश आहे. या नियमांबाबत जाणून घेऊया.
आजपासून होणार हे बदल; ज्यांचा होणार तुमच्या खिश्यावर परिणाम
पेंशन –
सरकारने निवृत्तीच्या 15 वर्षानंतर पेंशन रक्कम देण्याचा नियम सुरू केला आहे. या अंतर्गत या मे पासून संपुर्ण पेंशन मिळेल. ज्यांनी या पर्यायाची निवड केल्यास त्यांना पुर्ण पेंशन काही काळानंतर जीर्णोद्वार स्वरूपात मिळेल. यामुळे देशातील 6.5 लाख पेंशनधारकांना फायदा होईल.
एटीएम –
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारद्वारे पावले उचलली जात आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या वापरानंतर एटीएमला स्वच्छ केले जाईल. ही व्यवस्था गाझियाबाद आणि चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली आहे.
बोर्डिंग स्टेशन –
रेल्वे सेवेसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नियमानुसार आता प्रवासी चार्टच्या आधी 4 तासांपुर्वी बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील. याआधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन 24 तास आधी बदलण्याची परवानगी होती. जर प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यानंतरही प्रवास न केल्यास त्यांना रिफंड मिळणार नाही.
गॅस –
आजपासून 19 किलो आणि 14.2 किलोच्या विना सबसीडी एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. दिल्लीत 14.2 किलो विना सबसीडी एलपीजी सिलेंडर 162.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळे दिल्लीत गॅसची किंमत 744 रुपयांवरून 581.50 रुपये झाली आहे. तर मुंबईत किंमत 714.50 रुपयांवरून 579 रुपये झाला आहे.
दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला असून, त्याची किंमत 1285.50 रुपयांवरून 1029.50 रुपये झाला आहे. तर मुंबईतील किंमत 978 रुपये झाली आहे.
बचत खात्यावरील व्याज –
भारतीय स्टेट बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केला आहे. ग्राहकाला एक लाख रुपये जमा रक्केमवर 3.50 टक्के आणि 1 लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर 2.75 टक्के व्याज मिळेल, जे आधी 3.25 टक्के होते. आरबीआयने रेपो दर कमी केल्याने बँकांनी व्याजदर कमी केला आहे.
विमानसेवा –
सरकारी विमान कंपनी एयर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. आता एयर इंडिया ग्राहकांनी तिकीट रद्द केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. तिकीट बुकिंगच्या 24 तासाच्या आत रद्द केल्यास शुल्क आकारले जाणार नाही.
पीएनबी डिजिटल वॉलेट –
पंजाब नॅशनल बँकेने आजपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. पीएनबीचे ग्राहक जे पीएनबी किटी वॉलेटचा वापर करत होते, ते आता डिजिटल मोड जसे की आयएमपीएसचा वापर करू शकतात. ग्राहकांच्या खात्यात शून्य रक्कम असल्यासच ते वॉलेट अकाउंट बंद करू शकतात. अन्यथा ग्राहकांना पैसे खर्च करावे लागतील किंवा आयएमपीएसद्वारे दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकतात.