Viral : भुकेल्या अजगराने गिळले चक्क अख्खे हरिण

सर्वसाधारणपणे सापाने उंदीर, ससा अशा छोट्या प्राण्यांना गिळल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल, मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरस असून, यामध्ये एका अजगराने चक्क हरणाला गिळले आहे.

आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, विश्वास बसत नाही. हा बर्मीज पायथॉन एवढा भुकेला होता की त्याने हरणालाच गिळले.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की अजगराने एका मोठ्या हरणाला हळूहळू गिळत आहे. नीट पाहिल्यावर दिसून येते की, गिळताना अजगाराचे तोंड अधिक उघडते.

आतापर्यंत 22 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment