नासा पुन्हा मनुष्याला पाठवणार चंद्रावर, या कंपन्या बनवणार स्पेसक्राफ्ट

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या आगामी चंद्रावरील मिशनसाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या अंतराळवीरांसाठी स्पेसक्राफ्टची निर्मिती करतील. नासा 2024 मध्ये चंद्रावर एक महिला आणि पुरूष पाठवणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी नासाने लँडिंग सिस्टम बनविण्यासाठी तीन अमेरिकन अंतराळ कंपन्यांची निवड केली आहे.

या कंपन्यांचे नाव स्पेस एक्स, ब्लू ओरिजन आणि डायनेटिक्स आहे. यातील स्पेस एक्सचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क आणि ब्लू ओरिजनचे जेफ बेझॉस आहेत.

या तिन्ही कंपन्या नासासोबत मिळून लँडिंग सिस्टम तयार करतील. या लँडिंग सिस्टमद्वारे नासा अंतराळवीराना चंद्रावर उतरवणार आहे. नासा या कंपन्यांना 1 अब्ज डॉलर (जवळपास 7577 कोटी रुपये) देणार आहे. तिन्ही कंपन्यांना 10 महिन्यात सुरूवाती डिझाईन सादर करावे लागेल.

नासाचे व्यवस्थापक जिम ब्रिडेनस्टाइन म्हणाले की, कंपन्या या अंतराळवीरांच्या येण्या-जाण्याची सर्व काळजी घेतील. यासाठी एक असे यान बनवावे लागेल जे सहज चालू शकेल व सुरक्षित असेल.

ब्लू ओरिजन या कराराची प्राथमिक उमेदवार आहे. कंपनीच्या टीममध्ये मार्टीन, नॉर्थोप ग्रुम्मेन आणि ड्रेपर आहे. याचे लँडर तीन टप्प्याचे असेल. यात बीई -7 क्रायोजेनिक इंजिन असेल. लॉकहीड क्रू केबिन तयार करेल. नॉर्थॉप ग्रुमेन कार्गो आणि इंधन मॉड्यूल्स आणि ड्रॅपर मार्गदर्शन, नेव्हिगेशन, कंट्रोल, एव्हिओनिक्स आणि इतर सॉफ्टवेअर सिस्टम तयार करेल.

डायनेमिक्सकडे एकूण 25 सब-कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. जे या मिशनमध्ये कार्य करतील. या टीममध्ये मोठ्या संरक्षण कंपन्या देखील आहेत. त्याच्या डिझाइनमध्ये अनेक मॉड्यूलर प्रोपेलेंट वाहने असतील. क्रू केबिन जमिनीपासून वरती नसेल. दोन मोठे सौर पॅनेल असतील. यामुळे वाहनात जाणे सुलभ होईल.

इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सने आर्टेमिस मिशनसाठी स्टारशिप बनवले आहे. केवळ चंद्रच नाही तर, मंगळ आणि इतर ग्रहावर देखील जाऊ शकते यात विश्वसनीय रॅप्टर इंजिन आहे. क्रू केबिन बरेच मोठे आहे. तेथे दोन एअरलॉक्स आहेत, जेणेकरुन चंद्रावर चालणे सोपे होईल. हे वारंवार वापरण्यात येणारे रॉकेट आहे. त्याचे इंधन टँकर चंद्राभोवती फिरत राहील.

Leave a Comment