जेव्हा ऋषी कपूरने त्यांच्या पुराण्या हवेलीतील आणली माती


फोटो साभार टाईम्स ऑफ इस्लामाबाद
बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन झाले असले तरी त्यांच्या अनेक आठवणीना आता उजाळा मिळत आहे. कपूर खानदान मुळचे पेशावरचे. तेथे आजही त्यांची प्राचीन हवेली आहे. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात आले तेव्हा ही हवेली सोडूनच यावे लागले. ऋषी कपूर याना १९९० साली त्यांच्या या पितृक हवेलीला भेट देण्याची संधी मिळाली तेव्हा आपल्या या विरासतीची आठवण म्हणून त्यांनी अंगणातील माती बरोबर आणल्याचे आठवण सांगितली जाते.

१९१९ ते १९२२ या काळात ही प्रचंड वास्तू ऋषीचे पणजोबा आणि पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली. पृथ्वी कपूर हे सिनेसृष्टीत आलेले या खानदानातील पहिले पुरुष. राजकपूर यांचा जन्म याच हवेलीत झाला होता. मात्र फाळणीनंतर पाकिस्तानात जाणे अवघड बनल्याने कपूर घराण्यातील नव्या पिढीने ही हवेली पाहिलेली नव्हती. ४० खोल्या आणि अलिशान खिडक्या असलेली ही हवेली १९६८ मध्ये सराफ हाजी कुशल रसूल यांनी खरेदी केली होती. आता ही हवेली हाजी इसराशाह यांच्या ताब्यात आहे.


फोटो साभार भास्कर
१९९० मध्ये शशी कपूर, रणधीर आणि ऋषी यांच्यासह पाकिस्तानला गेले होते. तेथे हीना या चित्रपटाचे शुटींग केले गेले होते. तेव्हा त्यांनी पेशावरला जाऊन ही हवेली पाहिली. ऋषी कपूर यांनी हवेलीच्या अंगणातली माती त्यावेळी बरोबर बांधून आणली. एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी ही माहिती दिली होती. आता हवेली जुनी आणि पडीक होऊ लागल्याचे पाहून ऋषी यांनी पाकिस्तान सरकारला तेथे म्युझियम बनविले जावे अशी विनंती केली होती आणि ती मान्य झाली होती. आता या हवेलीत संग्रहालय बनविले जात असल्याचे समजते.

Leave a Comment