फोटो साभार ब्ल्युमबर्ग
रिलायन्स उद्योग कोविड १९ आणि त्यामुळे पुकाराव्या लागलेल्या लॉकडाऊन मुळे नुकसानीत चालल्याच्या बातम्या येत असतानाच रिलायंसने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याचे जाहीर केले गेले आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी हे स्वतः विनावेतन काम करणार आहेत तर १५ लाखाच्या आत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्के तर वरिष्ठ अधिकारी आणि संचालकांच्या वेतनात ३० ते ५० टक्के कपात केली जाणार आहे.
रिलायन्स मध्ये वेतन कपात, मुकेश करणार विनावेतन काम
करोना प्रकोपामुळे देशाची अर्थव्यवस्था बाधित होणार याचा अंदाज दिला गेला होताच आणि लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपण्यापूर्वी त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची रिलायंस याला अपवाद नाही. अंबानी यांचे वेतन वर्षाला १५ कोटी रुपये असून त्यात गेल्या ११ वर्षात वाढ केली गेलेली नाही. या वेतनातील ४.४५ कोटी त्यांना भत्ता म्हणून तर ९.५३ कोटी कमिशन म्हणून मिळतात. लॉक डाऊनमुळे रिफायनरी व्यवसाय अडचणीत आला आहे आणि कंपनीवर नफा मिळविण्याचा वाढता दबाव आहे. अश्या परिस्थितीत भरपाईसाठी वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.