रिझर्व बँकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक


फोटो साभार समायम तमिळ
जगभरातील केंद्रीय बँकांच्या ट्विटर फॉलोअर्स मध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक झाली असल्याचे सांगितले जात आहे. जगातील प्रमुख बँकांच्या ट्विटर खात्यांचे विश्लेषण केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार रिझर्व बँकेच्या ट्विटर हँडलवर ७ लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत. २० एप्रिलला एका दिवसात या आकड्यात १.३१ लाख नव्या फॉलोअर्सची भर पडली होती. गेल्या वर्षात रिझर्व बँकेच्या फॉलोअर्सची संख्या दुपटीहून अधिक वाढली असून ती ३ लाख ४२ हजार वरून ७ लाख ५० हजारापेक्षा अधिक झाली आहे. जानेवारी २०१२ मध्ये रिझर्व बँकेचे अधिकृत ट्विटर हँडल सुरु झाले होते.

रिझर्व्ह बॅंकेनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बँक ऑफ इंडोनेशिया असून ही ईस्ट एशियन नेशन्सची केंद्रीय बँक आहे. त्यांच्या ट्विटर हँडलचे ७ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत तर तीन नंबरवर बांको डे मेक्सिको बँक असून त्यांचे ७ लाख ११ हजार फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment