परवाना आणि नोंदणीची गरज नसलेली ई मोपेड आली


फोटो साभार जागरण
अहमदाबाद येथील स्टार्टअप ग्रीन वोल्ट मोबिलिटीने एक इलेक्ट्रिक टू व्हीलर सादर केली असून ही पहिलीच ई मोपेड आहे असे समजते. मँटीस असे नामकरण केलेल्या या मोपेड साठी चालकाला परवान्याची गरज नाही तसेच तिचे रजिस्ट्रेशन करण्याचीही आवश्यकता नाही. या मोपेडची एक्स शो रूम किंमत ३४९९९ असून सध्या ती फक्त अहमदाबाद येथेच विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोपेडचे प्री बुकिंग सुरु झाले असून ९९९ रुपये त्यासाठी भरावे लागणार आहेत.

ही मोपेड दिसायला इलेक्ट्रिक सायकल सारखी असून तिला मोठे टायर आणि एक आरामदायी सीट दिली गेली आहे. पॅडलचा वापर मागच्या चाकाला पॉवर सप्लाय करण्यासाठी करायचा आहे. मोपेडला एलईडी हेडलाईट, १ फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल व २ बाजूला डिस्क ब्रेक दिले गेले आहेत. २५० वॉटची मोटर आणि हलकी लिथियम आयन बॅटरी पॅक दिला गेला आहे. ही मोपेड फुलचार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात आणि त्यासाठी येणारा खर्च आहे फक्त ५ रुपये.

फुलचार्ज मध्ये ही मोपेड ५० किमी अंतर कापते. मोपेडचे सर्व कंपोनंट वॉटरप्रूफ असून मोटर आणि कंट्रोलरची लाईफ टाईम वॉरन्टी आहे. बॅटरी साठी दोन वर्षाची वॉरन्टी आहे.

Leave a Comment