किराणा आणायला गेलेला मुलगा सुनेला घेऊन परतला, आईने काय केले पहा

लॉकडाऊनच्या काळात लोक आपआपल्या घरात कैद असताना, दुसरीकडे अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या साहीबाबाद येथे चक्क एका आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की, तिने मुलाला किराणा सामान आणण्यासाठी पाठवले होते व तो परत येताना पत्नीला सोबत घेऊन आला.

त्या म्हणाल्या की, मी मुलाला किराणा सामान आणण्यासाठी पाठवले होते. मात्र परत येताना तो सोबत पत्नीलाच घेऊन आला. मला हे लग्न मान्य नाही. आईने सुनेला घरात घेण्यास नकार दिला आहे.

मात्र 26 वर्षीय गुड्डूने सांगितले की, त्याने 2 महिन्यांपुर्वीच हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात सवितासोबत लग्न केले होते.

त्याने सांगितले की, लग्नाचे साक्षीदार नसल्याने आम्हाला लग्नाचे प्रमाणपत्र बनवता आले नाही. आम्ही प्रमाणपत्रासाठी पुन्हा हरिद्वारला जाण्याचा निर्णय घेतला, मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.

त्याने पुढे सांगितले की, हरिद्वारवरून परतल्यावर सविता दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होती. मात्र मी आता तिला आईच्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. कारण तिला लॉकडाऊनमुळे घर खाली करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment