‘ही तर हुकुमशाही’, इलॉन मस्क यांनी लॉकडाऊनवर केली टीका

जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक आपआपल्या घरात कैद आहेत. यावर आता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी लॉकडाऊनला फॅसिस्ट कृती म्हटले आहे. तसेच हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन असून, यामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होत आहे.

कॅलिफोर्निया येथील उत्पादन बंद करण्यास सांगितल्याने मस्क यांनी या निर्णयावर टीका केली.

मस्क म्हणाले की, हे एकप्रकारे लोकांना स्वतःच्या घरात जबरदस्तीने कैद करण्यासारखे आहे. हे घटनात्मक हक्काचा विरुद्ध असून, लोकांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. यामुळे टेस्लाच नाहीतर सर्वच कंपन्यांना मोठे नुकसान होणार नाही.

लॉकडाऊनबाबत मस्क म्हणाले की, मला वाटते की लोकांमध्ये या प्रती नक्कीच राग आहे. हे लोकांना घरात कैद करण्यासारखे असून, ही हुकुमशाही आहे. लोकशाही नाही. हे स्वातंत्र्य नाही. लोकांना त्यांचे स्वातंत्र्य परत द्या.

Leave a Comment