बॉलिवूडकरांनी ऋषी कपूर यांना दिली श्रद्धांजली

चित्रपटसृष्टीला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला असून, अभिनेता इरफान खाननंतर आता ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते.

ऋषी कपूर यांना बॉलिवूडसह, नेतेमंडळी, विविध क्षेत्रातील मंडळीनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सर्वात प्रथम ऋषी कपूर यांच्या निधनासंदर्भात ट्विट केले. मी उद्धवस्त झालो, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले की , हे एखादे वाईट स्वप्न असल्यासारखे आहे. ऋषी कपूर यांचे निधन ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. ते एक महान सह-कलाकार आणि चांगले कौटुंबिक मित्र होते.

अभिनेता फरहान अख्तरने देखील चित्रपटसृष्टी, प्रेक्षकांसाठी हे मोठे नुकसान असल्याचे म्हटले.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटर लिहिले की, काय बोलू ? काय लिहू काही समजत नाही. ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठे नुकसान झाले.

आपण एका महान व्यक्तीला गमावल्याचे म्हणत अमिर खानने आपल्या भावना व्यक्त केल्या.

सलमान खानने ट्विट केले की, आरआयपी चिंटू सर, जे झाले त्यासाठी माफ करा.

या व्यतिरिक्त तापसी पन्नू, कायरा अडवाणी, सनी देओल, स्वारा भास्कर या अनेक बॉलिवूडकरांनी आपल्या भावना व्यक्त केले.

Leave a Comment