ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी आज सकाळी मुंबईत निधन झाले. ते जवळफास 2 वर्षांपासून कॅन्सरशी लढत होते. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून थेट स्मशान भूमीत आणण्यात आले.
जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत ऋषि कपूर यांच्यावर पार पडले अंत्यसंस्कार
त्यांच्यावर मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार झाले. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह केवळ 24 जण उपस्थित होते. त्यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीवरून येऊ शकली नाही.
अंतिम संस्कार केल्यानंतर मरीन लाईन्स ब्रिजवर मोठी गर्दी जमा झाली होती. ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना वारंवार अनाउंसमेंट करावी लागली.
मुलगी रिद्धीमा वेळेवर येऊ न शकल्याने तिच्याच शिवाय अंतिम संस्कार पार पडले. यावेळी अभिषेक बच्चन, आदर जैन, आलिया भट्ट, सैफ अली खान, नीतू कपूर, रणबीर कपूर, रीमा जैन, मनोज जैन, अरमान जैन, आदर जैन, अनीशा जैन, विमल पारेख, अयान मुखर्जी, राहुल रवैल, करीना कपूर, राजीव कपूर, रणधीर कपूर, नताशा नंदन, रोहित धवन आणि राहुल रवैल हे उपस्थित होते.