… तर 40% रेस्टोरेंट कायमचे बंद पडणार ?

कोरोना व्हायरसमुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे. याचा फटका रेस्टोरेंट व्यवसायाला देखील बसला आहे. जर सरकारने या क्षेत्राला आर्थिक मदत जाहीर न केल्यास 10 पैकी 4 रेस्टोरेंट कायमचे बंद पडण्याची शक्यता आहे. भारतात रेस्टोरेंट व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 4 लाख कोटी रुपये असून, 70 लाख लोकांना याद्वारे थेट रोजगार मिळतो.

नॅशनल रेस्टोरेंट असोसिएशन ऑफ इंडियानुसार, जवळपास 70 टक्के फूड डिलिव्हरी व्यवसाय कमी झाला आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती पुन्हा आधीसारखी होण्यासाठी खूप वेळ लागेल. पगार आणि नोकरीमध्ये कपातमुळे ग्राहक या गोष्टींवर कमी खर्च करत आहेत.

स्विगीने देखील आपले काही खाजगी ब्रँड हॉटेल्स देखील बंद करण्याची घोषणा केली आहे. रेडसीर कंसल्टिंगनुसार, फुड डिलिव्हरी पुन्हा पहिल्या सारखे होण्यासाठी एक वर्ष तरी लागतील. छोटी शहर आणि गावामध्ये तर हा कालावधी अधिक असेल.

यासोबतच काही उद्योजक आपल्या व्यवसायाला नवीन रुप देण्याचा प्रयत्न करत आहेत. पॅकेजिंग फूड, डू इट यूव्हरसेल्फ डिलिव्हरी, मेन्यूमध्ये बदल आणि घरपोच किराणाची सोय देत आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मोठमोठे ब्रँड्स देखील ऑर्डरची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. रिबेल फूड्स, इम्प्रेसेरियो स्मोक हाऊस डेली नवनवीन पद्धती शोधत आहेत.

डाईनआउट आणि झोमॅटो सारख्या कंपन्या रेस्टोरेंटसोबत कॉन्टॅक्टलेस डायनिंग प्रोडक्ट सुरू करण्याविषयी चर्चा करत आहेत. यामुळे किंमतीत 4 ते 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment