पाकिस्तानची नवी खेळी, बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप, सेना जवानांना सावध राहण्याची सुचना

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केले आहे. मात्र या अ‍ॅपच्या बनावट आवृत्तीमुळे भारतीय सैन्याची चिंता वाढवली आहे. सैन्याने या बाबत आपल्या जवानांना सूचना दिली आहे. सैन्याने जारी केलेल्या सुचनेनुसार, हे बनावट अ‍ॅप संवेदनशील माहिती चोरी करू शकते. सुरक्षा एजेंसीने सैन्य आणि निमलष्कर दलांना पाकिस्तानमध्ये बनविण्यात आलेल्या बनावट अ‍ॅपविषयी सावध केले आहे.

एजेंसीने म्हटले आहे की, चुकीच्या हेतूने आरोग्य सेतूचे बनावट अ‍ॅप बनविण्यात आले आहे. याचा उद्देश संवेदनशील माहिती चोरी करणे हा आहे. हे अ‍ॅप युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप अथवा मेसेजद्वारे लिंक पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. त्यामुळे सर्व जवानांना मायगव्हच्या अधिकृत साईट वरूनच हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे.

हे बनावट अ‍ॅप अतिरिक्त अ‍ॅप्लिकेशन पॅकेज इंस्टॉल करण्यास सांगते. हे अ‍ॅप फेस डॉट एपीके, आयएमओ डॉट एपीके, नॉर्मल डॉट एपीके, ट्रूसी डॉट एपीके, स्नॅप डॉट एपीके आणि वायबर डॉट एपीके इंस्टॉल करते. यानंतर व्हायरस हॅकर्सपर्यंत स्मार्टफोनमधील माहिती पोहचवते.

याशिवाय सैनिकांना मोबाईलवर येणाऱ्या मेसेज लिंकवर क्लिक करण्याआधी सावध राहावे. तसेच अँटी व्हायरस देखील अपडेट करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment