… म्हणून व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो

अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे मुख्य कार्यालय असणाऱ्या व्हाईट हाऊसने आपल्या ट्विटर हँडलवरून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना का अनफॉलो केले याचे स्पष्टीकरण दिले.

व्हाईट हाऊसने सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्या देशांचा दौरा करणार असतात, तेथील अधिकृत अकाउंट्स काही काळासाठी दौऱ्याचे मेसेजला रिट्विट करण्यासाठी फॉलो केले जाते.

अमेरिकेचे राष्ट्रपती फेब्रुवारी महिन्यात भारतीय दौऱ्यावर आले होते. त्या काळात व्हाईट हाऊसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना फॉलो केले होते. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीला व्हाईट हाऊसने या अकाउंट्सला अनफॉलो केले.

हे अकाउंट अनफॉलो केल्यानंतर अनेक भारतीय युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना अनफॉलो केल्यानंतर निराशा व्यक्त केली होती.

Leave a Comment