पृथ्वीवर होत आहे चंद्राच्या तुकड्याची विक्री, एवढ्या कोटींची आहे किंमत

पृथ्वीवरील पाचव्या सर्वात मोठा चंद्राच्या उल्कापिंडाच्या तुकड्याची लवकरच 2.49 मिलियन डॉलर्समध्ये (जवळपास 19 कोटी रुपये) विक्री होणार आहे. चंद्राच्या या तुकड्याचे वजन 13.5 किलो असून, कदाचित लघुग्रह आणि धूमकेतूला धडकल्याने हा चंद्राचा तुकडा तुटून सहारा वाळवंटात पडला.

चंद्राच्या या तुकड्याचे नाव NWA 12691 आहे. पृथ्वीवर आढळलेला हा पाचवा सर्वात मोठा चंद्राचा तुकडा आहे. पृथ्वीवर जवळपास 650 किलो वजनाचे चंद्राचे तुकडे आहेत.

क्रिस्टीचे विज्ञान आणि नैसर्गिक इतिहासाचे प्रमुख जेम्स हिस्लोप म्हणाले की, आपल्या हातात दुसऱ्या जगातील एक तुकडा पकडणे हा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकत नाही. हा तुकडा फुटबॉलच्या आकाराचा असून, थोडा तिरका आहे.

अनोळखी व्यक्तीला साहारा वाळवंटात हा तुकडा मिळाला होता. अपोलो मिशन दरम्यान नासाने चंद्रावरून आणलेल्या नमुन्यासोबत याची तुलना केल्यानंतर हा चंद्राचा तुकडा असल्याची पुष्टी केली होती.

1960-70 च्या दशकात नासाने अपोलो मिशनदरम्यान 400 किलो वजनी चंद्राचे तुकडे पृथ्वीवर आणले होते. हे उल्कापिंड दुर्मिळ आहेत, अशी माहिती हिस्लोप यांनी दिली.

क्रिस्टी या व्यतिरिक्त 13 आयर्न उल्कांची विक्री करणार आहे. ज्याची किंमत जवळपास 1.4 मिलियन पाउंड आहे.

Leave a Comment