केंद्र सरकारच्या या विभागांमध्ये जागा भरती, जाणून घ्या

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाद्वारे 40 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या पदांमध्ये सायंटिस्ट ‘बी’- 13, ज्यूनियर सायंटिस्ट असिस्टेंट – 2, सीनियर टेक्निशियन- 6, डाटा एंट्री ऑपरेटर (ग्रेड – II) – 2, ज्यूनियर टेक्निशियन – 2, ज्यूनियर लॅब असिस्टेंट – 7, लोअर डिव्हिजनल क्लार्क (एलडीसी) – 13 आणि अटेंडेंट (एमटीएस) – 3 या पदांचा समावेश आहे.

इच्छुक उमेदावारासाठी काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्ष, तर काही पदांसाठी 35 वर्ष आहे. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

अर्ज व पदांसाठीच्या अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार cpcb.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच याच वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Leave a Comment