चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. सुरूवातीपासूनच अमेरिका चीनवर या व्हायरसची माहिती लपवल्याचा आरोप करत असून, वारंवार चीनवर टीका करत आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला आहे. ट्रम्प म्हणाले की, चीनला मला पुन्हा निवडणुकीत हरवण्यासाठी काहीही करू शकतो.
मला हरविण्यासाठी चीन काहीही करू शकते – ट्रम्प
रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, या महामारीचे चीनला मोठे परिणाम भोगावे लागतील. चीनने या व्हायरसबाबत आधी माहिती द्यायला हवी होती.
कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. चांगली अर्थव्यवस्था हा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार होतो. मात्र महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
ट्रम्प म्हणाले की , मी खूप काही गोष्टी करू शकतो. नक्की काय झाले याची आम्ही पाहणी करत आहोत. चीन निवडणुकीत मला हरवण्यासाठी काहीही करू शकते.
डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडन यांनी जिंकावे असे, चीनला वाटते. मी पोल्सवर विश्वास ठेवत नाही. माझा विश्वास आहे की या देशातील लोक हुशार आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.