गरिबांसाठी सरकारला 65 हजार कोटी खर्च करावे लागतील – राजन

कोरोना व्हायरसमुळे जवळपास 1 महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. सर्व काही बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केली.

रघुराम राजन म्हणाले की, या काळात गरिबांची मदत करणे गरजेचे आहे. ज्यासाठी सरकारचे 65 हजार कोटी रुपये खर्च होतील. या संदर्भात आजतकने वृत्त दिले आहे.

राजन म्हणाले की, जागतिक स्तरावर भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. नवीन जागतिक स्थानांमध्ये भारत स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो. शक्तीहीन लोकांना शक्तिशाली नेता आवडतो. आपण एका विभाजित समाजाहसह कोठेच पोहचू शकत नाही.

ते म्हणाले की, आज आरोग्य, नोकरीसाठी चांगल्या व्यवस्थेची गरज आहे. जागतिक आर्थिक प्रणालीमध्ये काहीतरी चुकीचे आहे. लोकांकडे नोकरी नाही आणि ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना पुढील चिंता आहे. उत्पन्नाचा स्तर असमान आहे. सर्वांना समान संधी मिळणे गरजेचे आहे.

या चर्चेत राहुल गांधी म्हणाले की, भारतीय समाज व्यवस्था अमेरिका समाजापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे सामाजिक बदल गरजेचे आहेत. प्रत्येक राज्य वेगळे असून, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशला एकाच दृष्टीने पाहता येत नाही. कोरोनावर मात करण्यासोबतच रोजगाराबाबत देखील विचार केला पाहिजे. इतर देशांच्या तुलनेत भारतात टेस्टिंग कमी होत आहे, असेही ते म्हणाले.

राजन म्हणाले की, आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्था सुरू करायला हवी. कारण आपल्याकडे दुसऱ्या देशांप्रमाणे चांगली व्यवस्था नाही. आकडे चिंताजनक असून, सीएमआयईने 10 कोटी लोकांच्या नोकऱ्या जातील असे सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला मोठी पावले उचलावी लागतील.

Leave a Comment