स्मार्टफोन कंपनी वनप्लस लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रोच्या तुलनेत अधिक स्वस्त असेल. हा फोन वनप्लस झेड असल्याचे सांगितले जात आहे.
वनप्लस आणणार स्वस्त ‘Z’ फोन, या महिन्यात होणार लाँच
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, वनप्लस झेड डिव्हाईस जुलै महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. लेटेस्ट वनप्लस प्लॅगशिपच्या लाँचिंग दरम्यान वनप्लस 8 लाईट लाँच करण्याची शक्यता होती. मात्र कंपनीने यासाठी वेगळी तारीख निश्चित केली आहे.
वनप्लस झेडमध्ये मीडियाटेक प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती खरी असल्यास वनप्लस झेड कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल, ज्यात क्वॉलकॉमचे प्रोसेसर मिळणार नाही.
डिव्हाईसच्या टीझरवरून लक्षात येते की वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रोच्या तुलनेत बॉक्स शेपच्या डिझाईनमध्ये येण्याची शक्यता आहे. कॅमेरा पंच होल मिळेल. कंपनीकडून मात्र अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.