ऑटोमोबाईल कंपनी लवकरच आपली बीएस-6 व्हेरिएंट निसान किक्स भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर यासंबंधी माहिती दिली आहे. या कारमध्ये 1.3 लीटर-टर्बो इंजिन मिळेल.
बीएस-6 निसान किक्समध्ये येणारे 1.3 लीटर, 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 154bhp पॉवर आणि 254Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत येणारे किक्स सर्वात पॉवरफूल मिड-साईज एसयूव्ही आहे. हे इंजिन आधुनिक 8 स्टेप सीव्हीटी गियरबॉक्ससोबत येते. यात 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सचा देखील पर्याय मिळेल.
मर्सिडिजच्या कार्समध्ये देखील हेच इंजिन मिळते. हे इंजिन एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये मिळेल. तर एंट्री लेव्हल व्हेरिएंट्समध्ये 106bhp पॉवरचे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल.

फीचर्सबद्दल सांगायचे तर निसान किक्स टर्बोमध्ये काही हाय-अँड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, अनेक एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. निसान किक्स ह्युंडाई क्रेटा आणि किआ सेल्टॉस सारखे एसयूव्ही मिळतील.
निसान लवकरच आपली बहुप्रतिक्षित सब-कॉम्पॅक्ट मॅग्नाइटला देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.