३० वर्षानंतर चमकला याच्या नशिबाचा १५ कोटीचा तारा


फोटो साभार ग्लोबल न्यूज
दीर्घकाळची चिकाटी एखाद्याला कसे यश मिळवून देते याचा एक अजब नमुना अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील जोई बी नावाच्या माणसाने पेश केला आहे. जोई गेली तीस वर्षे एकच नंबरची लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता आणि नवल म्हणजे त्याला एकच दिवशी एकाच नंबरच्या लॉटरी लागल्या त्याही जॅकपॉट. म्हणजे तीस वर्षे त्याने दाखविलेल्या चिकाटीमुळे अखेर त्याच्या नशिबाचा तारा चमकला. या दोन जॅकपॉटमधून त्याला प्रत्येकी १० लाख म्हणजे २० लाख डॉलर्स मिळाले. भारतीय रुपयात ही रक्कम आहे साधारण १५ कोटी रुपये.

युएस न्यूजने दिलेल्या बातमीनुसार जोई बी याने पॉवरबॉल जॅकपॉट लॉटरीची एकच नंबरची दोन तिकिटे वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी केली होती. एक तिकीट त्याने सकाळी खरेदी केले तर दुसरे संध्याकाळी. विशेष म्हणजे या नंबरला जॅकपॉट लागल्याचे जाहीर झाले. लॉक डाऊन असल्याने जोई बीला बक्षिसाची रक्कम ऑनलाईनने पाठविली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. जोईची चिकाटी आणि नशीब यांची चर्चा संपूर्ण कोलोराडो मध्ये होत असल्याचे बातमीत म्हटले आहे.

Leave a Comment