किम जोंग उनचा शोध घेताहेत पाच अमेरिकी स्पाय


फोटो साभार अल बवादा
उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन जिवंत आहे की मेला, जिवंत असेल तर तो कोठे आहे, कुठे लपला आहे का करोनाच्या भीतीमुळे अन्यत्र कुठे आसरा घेऊन राहिला आहे याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने पाच गुप्तहेर पाठविले असल्याची बातमी द सन आणि डेली मेलने दिली आहे. अर्थात हे गुप्तहेर म्हणजे अमेरिकेची अत्यंत खात्रीची स्पाय विमाने आहेत आणि ही विमाने कुठूनही किम जोंगला शोधून काढण्यास सक्षम आहेत असा दावा केला जात आहे.

दक्षिण कोरियातील अमेरिकन बेसवरून ही हायटेक विमाने किम जोंग वर नजर ठेऊन आहेत. द. कोरियाच्या गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. यातील पहिले आरसी १२ एक्स गार्द्रील या सिग्नल इंटेलिजन्स विमानाला जगात जोड नाही. दुसरे एअरफोर्स ई- ८ सी हे एअर बोर्न बॅटल मॅनेजमेंट मधील बादशहा मानले जाते आणि इराक सिरीया युद्धात ते वापरले गेले होते. तिसरे ईओ- ५ सी हे फोटो काढणे, सिग्नल पकडणे आणि जमिनीवरील बारीक हालचाली रडारच्या सहाय्याने टिपण्यात माहीर आहे. आणखी दोन हायटेक विमाने द. कोरियाच्या बेसवरून सीमेवर पाळत ठेऊन आहेत. किमची बारीकशी हालचाल सुद्धा ही विमाने थेट व्हाईट हाउस ला कळवतील.

किम जोंग उन काही दिवसांपासून अचानक गायब झाल्याने जगभरात खळबळ माजली आहे. त्याची तब्येत गंभीर आहे येथपासून त्याचे निधन झाल्याच्या बातम्या सतत येत आहेत. न्यूज वेबसाईट प्रोफेशनल रिसर्च प्लॅटफॉर्मने सॅटेलाईट इमेज जारी केली असून त्यानुसार किम त्याच्या अलिशान याच वर करोनाच्या भीतीमुळे राहिला असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment