आगामी काळात चहा किंमती कडाडणार


फोटो साभार डेक्कन हेराल्ड
आगामी काळात सर्वसामान्य जनतेचे उत्साह वर्धक पेय चहाच्या किमती चांगल्याच कडाडतील असा इशारा दिला गेला आहे. कोविड १९ मुळे भारतात लॉक डाऊन आहे आणि त्याचा थेट परिणाम चहा उद्योगावर झाला आहे. त्याचबरोबर चहा उत्पादन करणाऱ्या चीन, केनिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये सुद्धा कोविड १९ चा प्रसार असल्याने तेथील चहा उद्योगसुद्धा अडचणींचा सामना करत आहे. परिणामी आगामी काळात चहाच्या किमती कडाडतील असा अंदाज वर्तविला गेला आहे.

वरील देशात जगात एकूण पिकणाऱ्या चहाच्या ८२ टक्के चहा पिकविला जातो. लॉकडाऊन असल्याने शिपमेंट उशिरा होत आहेत. भारतातील चहा उत्पादनात २०२० मध्ये ९ टक्के घट अपेक्षित आहे. आंतरराष्टीय चहा समितीने हा अंदाज दिला आहे. २०२० मध्ये चहा निर्यातीत सुद्धा ७ टक्के घट होईल असे त्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यात चहा निर्यात ३४ टक्क्यांनी घटली असून ही निर्यात श्रीलंकेच्या निर्यातीच्या अर्धीच आहे. जगातला मोठा निर्यातदार केनिया मधूनही निर्यात थंडावली आहे.

कच्चा चहा आयात करणारया रशियन कंपनीने लॉकडाऊन मुळे चहा आयात कमी असल्याचे व त्यामुळे किमती वाढल्याचे सांगितले आहे. जगातील सर्वात उत्तम चहा उत्पादक दार्जिलिंग मध्येही लॉकडाऊन मुळे परिस्थिती अडचणीची बनली आहे. जगातील सर्वात महाग चहा येथेच पिकतो. वाहतूक करणारे ट्रक लॉक डाऊन मुळे पुरेश्या संखेने नाहीत. त्यामुळे आसाम मधून तीन दिवसात पोहोचणांरया चहासाठी आता सात दिवस लागत आहे. एकट्या आसाम मध्ये चहा उद्योगाचे १२१८ कोटींचे नुकसान होईल असे सध्याचे अनुमान आहे.

Leave a Comment