लॉकडाऊनमुळे भारतीय गुगलवर शोधत आहेत नोकऱ्या

कोरोना व्हायरसमुळे सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. यामुळे शाळा-कॉलेजसह कंपन्या, फॅक्ट्री देखील बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसत असून, यामुळे लाखो लोकांची नोकरी जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे भारतीय गुगलवर नोकऱ्या सर्च करत आहेत.

गुगल सर्चनुसार, भारतात लॉकडाऊनसोबतच लोकांचा तणाव देखील वाढत आहे. लोक गुगलवर तणावमुक्त होण्याच्या टिप्स शोधत आहे. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक गोष्टींची काळजी वाटत आहे. लोक दिवस-रात्र नोकरी, कुटुंब आणि पैशांचा विचार करत असल्याने त्यांची मानसिक स्थिती देखील बिघडली आहे. इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या सर्वेक्षणानुसार, लॉकडाऊनमध्ये मानसिक आजाराच्या प्रकरणात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अंडमान निकोबर बेट, मिझोरम आणि पुदुचेरी सारख्या भागांमध्ये तणाव कमी करण्याच्या थेरेपीसंबंधी सर्वाधिक सर्च होत आहे.

नोकरीसंबंधी भारतात अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक सर्च केले जात आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात बेरोजगारी वेगाने वाढेल. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असू शकते. या रिपोर्टनंतर लोक गुगलवर नोकरी संदर्भात सर्वाधिक सर्च करत आहेत.

लॉकडाऊनच्या वेळेचा उपयोग करत लोक काही नवीन करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. गोवा, दमन-दीव आणि कर्नाटकमध्ये नवीन रेसिपी संदर्भात सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

Leave a Comment