बोरिस जॉन्सन झाले बाबा… जोडीदार कॅरीने दिला गोंडस बाळाला जन्म

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी अशा वेळी जेव्हा 32 वर्षीय कॅरी या आणखी काही आठवड्यांनी बाळाला जन्म देण्याची शक्यता होती.

बोरिस जॉन्सन हे नुकतेच कोरोनावर मात करून आपल्या कामावर परतले असताना कॅरी यांनी बाळाला जन्म दिला आहे.

आई आणि बाळ दोन्हीही सुखरूप आहेत व पंतप्रधान आणि सायमंड्स यांनी एनएचएसच्या मॅटरनिटी टीमचे आभार मानले आहेत, असे प्रवक्त्यांनी सांगितले.

जॉन्सन यांना 5 मुले असल्याची सांगितली जातात. ज्यातील 4 त्यांची दुसरी पत्नी मरीना व्हिलर यांची आहेत. व्हिलर आणि जॉन्सन हे 2018 मध्ये वेगळे झाले होते. सायमंड्स आणि जॉन्सन 2019 पासून सोबत आहेत. रिपोर्टनुसार मागील वर्षी त्यांचा साखरपुडा झाल्याचे देखील सांगितले जाते.

Leave a Comment