मुख्यमंत्र्यांनी वाहिली मेहनती, अष्टपैलू अभिनेत्याला श्रध्दांजली


मुंबई – आपल्या बहुआयामी आणि दमदार भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर ठासा उमवटणारा अभिनेता इरफान खानचे आज सकाळी निधन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहनती, अष्टपैलू अशा अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.


हिंदी चित्रपट सृष्टीने अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना परत उत्साहाने उभे राहिले. त्यांना दुर्दैवाने काळाने ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इरफान खान याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


इरफान आजारामुळे दोन वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर होता. काही दिवसांपूर्वीच ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा प्रेक्षकांसमोर आला होता. पण मी तुमच्याबरोबर या वेळी असेनही आणि नसेनही, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी व्यक्त केल्या होत्या.

Leave a Comment