या बँकेने लाखो चुकीच्या खात्यात पाठवला सरकारचा कोट्यावधींचा मदत निधी

कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात जनधन खात्यांसाठी सरकारतर्फे देण्यात आलेल्या निधीबाबत तेलंगाना ग्रामीण बँकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. बँकेने सरकारच्या 500 रुपये मदत निधीला 3 लाखांपेक्षा अधिक चुकीच्या खात्यात ट्रांसफर केले आहे. आता चूक समजल्यानंतर बँक 3 लाख खात्यांमध्ये 16 कोटी रुपये परत घेत आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

यातील जवळपास एक लाख खातेधारकांनी बँकेतून हा मदत निधी काढला देखील होता. मात्र आता बँक हे पैसे परत मिळवत आहे. बँकेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खात्यात पैसे ट्रांसफर केले होते व एक आठवड्यानंतर चूक समोर आली. ही चूक कोठे झाली याचा तपास करत आहे.

लॉकडाऊनमुळे सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब महिलांच्या खात्यात 500 रुपये ट्रांसफर करण्याची घोषणा केली होती. लाभार्थींना तीन महिने ही रक्कम मिळणार आहे. ज्याची सुरूवात एप्रिलपासून झाली आहे.

तेलंगाना ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर (आयटी) व्हीएस महेश यांनी सांगितले की, नियमानुसार 1 ऑगस्ट 2014 नंतर उघडण्यात आलेल्या खातेधारकांनाच रक्कम मिळणार आहे. चुकीने सर्व झिरो अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले. चूक समोर आल्यानंतर 16 कोटी रुपये परत वसूल केले जात आहेत.

Leave a Comment