लॉकडाऊन : आता चक्क उत्तर प्रदेशमधून दिसत आहेत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा

लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्या, फॅक्ट्री आणि वाहतूक बंद आहेत. नागरिक स्वतःच्या घरात कैद आहेत. यामुळे भारतातील अनेक प्रमुख शहरांमधील प्रदुषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. प्रदुषण एवढे कमी झाले आहे की उत्तर प्रदेशच्या सहारनपूरवरून हिमालयाची बर्फाच्छादित शिखर दिसू लागली आहेत.

आयटी अधिकारी दुष्यंत सिंह यांनी हे फोटो काढले असून, आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले.

रिपार्टनुसार, सहारनपूरची हवा गुणवत्ता निर्देशांक (एआयक्यू) सध्या 40 असून, सहारनपूरपासून 150-200 किमी अंतरावरील या बर्फाच्छादित पर्वतरांगा दिसत आहेत.

इंटरनेटवर फोटो व्हायरस झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपले अनुभव शेअर केले. सोबतच पर्यावरणातील या बदलाचे देखील स्वागत केले.

Leave a Comment