सावधान ! ईमेलद्वारे धमकी देऊन पैसे उकळत आहेत हॅकर्स

मागील काही दिवसात हॅकर्स हँकिंगच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. आता इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पॉस टीमने (सीईआरटी-इन) युजर्सला ईमेल एक्सटॉर्शन फ्रॉर्डपासून सावध केले आहे.

सीईआरटी-इनने म्हटले आहे की, हॅकर्सने युजर्सला कॉम्प्युटर आणि पासवर्ड हॅक करण्याविषयी लिहिलेले अनेक ईमेल्स पाठवले आहेत. ईमेलमध्ये हॅकर्स दावा करतात की, त्यांनी कॉम्प्युटर वेबकॅमद्वारे व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, त्यांना युजरचा पासवर्ड माहिती आहे.

हॅकर्सला युजर्सला कॉम्प्युटर आणि पासवर्ड हॅक होण्याचे काही पुरावे देखील देतात. यानंतर बिटकॉईन अथवा इतर माध्यमातून पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास खाजगी फोटो व इतर संवेदनशील डेटा लीक करण्याची धमकी देतात.

हॅकर्स तुम्ही आधी पाठवलेल्या पासवर्डची यादी देत असतात. हे पासवर्ड त्यांनी हँकिंग नाहीतर युजरने शेअर केलेल्या ऑनलाईन डेटाद्वारे माहिती मिळते. सीईआरटी-इनने आपल्या एडवायजरीमध्ये म्हटले आहे की, अशा बनावट ईमेल स्कॅमला घाबरण्याची काहीही गरज नाही.

हॅकर्सला युजर घाबरवण्यासाठी मेसेंजर कॉन्टॅक्ट, फेसबुक अकाउंट आणि ईमेल अकाउंटला सॉफ्टवेअरद्वारे हॅक केल्याचा दावा करतात. यामुळे अनेक युजर घाबरतात. याचाच फायदा उचलून हॅकर युजरकडून बिटकॉईन अथवा दुसऱ्या पेमेंट मोडद्वारे पेसे उकळतात.

Leave a Comment