किम जोंग उनचे काका अचानक का बनले चर्चेचा विषय ?

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या प्रकृतीविषयी सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृत्यू झाल्यास उत्तर कोरियाचा पुढील हुकुमशहा कोण असेल, याच्याविषयी देखील जगभरात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपासून या पदासाठी किम यांची बहिण किम यो जोंग यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता किम यांचे काका किम प्योंग इल यांचे नाव चर्चेत आले आहे.

65 वर्षीय किम प्योंग इल हे उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल संग यांचे एकमेव जिवित पुत्र आहेत. मात्र 1970 च्या दशकात भाऊ किम जोंग इल यांच्या हातात सत्ता आल्यानंतर ते 4 दशक परदेशात होते.

किम प्योंग इल हे मागील 4 दशके हंगेरी, बुल्गेरिया, फिनलँड, पोलंड आणि चेक रिपब्लिकमध्ये राजदूताच्या पदावर राहिल्यानंतर मागील वर्षी देशात परतले आहेत.

किम प्योंग इल यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले असून, सत्तेला आव्हान देण्यासाठी त्यांना विशेष पाठिंबा देखील नव्हता. मात्र काहीजणांच्या मते किम इल संग यांचे पुत्र व पुरूष असल्याने ते किम जोंग उन यांची जागा घेऊ शकतात.

किम यांची बहिण किम यो जोंग यांचे कमी वय आणि महिला असल्याने त्यांना काका किम प्योंग इल यांच्याकडून सत्तेसाठी आव्हान मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

उत्तर कोरियाच्या ब्रिटनमध्ये उप राजदूत असलेले थाय योंग हो यांनी सांगितले की, किम यो जोंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाचा टिकाव लागणे अवघड आहे. यामुळे गोंधळ उडू शकतो. त्यामुळे सत्तेत असलेल्यांकडून किम प्योंग इल यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. ते सध्या हाऊस अरेस्ट आहेत.

मात्र दक्षिण कोरियामधील नेत्यांना किम प्योंग इल सत्ता मिळवतील असे अजिबात वाटत नाही. 2011 मध्ये सत्ते आल्यानंतर किम जोंग उन यांनी आपले प्रतिस्पर्धी काका, डेप्यूटी जँग साँग थेईक यांना देखील हटवले होते. तसेच मलेशियामध्ये आपला भाऊ किम जोंग नामची हत्या करण्याचे आदेश दिल्याचे देखील सांगितले जाते.

उत्तर कोरियाच्या संस्थापकाची द्वितीय पत्नी किम सोंग ए यांनी देखील 1970 मध्ये किम प्योंग इल यांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र किम जोंग इल यांना उत्तराधिकारी घोषित केल्यानंतर त्या मागे पडल्या.

Leave a Comment