उमरने सचिन, धोनी आणि विराटकडून शिकावे, बंदीनंतर कामरानचा भावाला सल्ला

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डोने तीन वर्षांची बंदी घातली आहे. बुकींची भेट घेतल्याची माहिती लपवल्यामुळे उमर अकमलवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावर आता उमरचा मोठा भाऊ क्रिकेटपटू कामरान अकमलने प्रतिक्रिया दिली आहे.

उमरने सचिन तेंडूलकर, विराट कोहली आणि धोनीच्या मैदानातील व बाहेरील आचरणापासून काहीतरी शिकावे, असे कामरान अकलमने म्हटले आहे.

एका चॅटशोमध्ये कामरान म्हणाला की, माझा उमरला एकच सल्ला आहे की त्याने शिकावे. त्याने जर चूक केली असेल तर दुसऱ्यांकडून शिकावे. तो अजून तरूण आहे, आयुष्यात अनेक व्यत्यय येत असतात.

कामरान म्हणाला की, त्याने विराटकडून शिकावे. आयपीएलच्या सुरूवातीच्या दिवसात विराट वेगळा होता. मात्र नंतर त्याने त्याच्या दृष्टीकोनात बदल केला व आज तो जगातील नंबर एकचा बॅट्समन आहे.

तेंडूलकर आणि धोनी हे कसे नेहमी वादापासून लांब राहिले आहेत, ते त्याने पाहावे. बाबर आझम आज जगातील तीन टॉपच्या फलंदाजामध्ये आहे. धोनीने कशाप्रकारे आपल्या संघाचे नेतृत्व केले. सचिन नेहमी वादापासून लांब राहीला, हे सर्व उदाहरण त्याच्या समोर आहे, असेही कामरान म्हणाला.

कामराननुसार, त्याच्या भावाला कठोर शिक्षा देण्यात आली असून, याच गुन्ह्यासाठी दुसऱ्यांना कमी शिक्षा देण्यात आलेली आहे.

Leave a Comment