इरफानचा चाहत्यांसाठी शेवटचा खास संदेश


मागील दीर्घ काळापासून गंभीर आजारासोबत अभिनेता इरफान खान झुंज देत होता. त्याने आजारी असतानाही आपल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या शेवटच्या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले होते. पण इरफानला आजारामुळे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणे शक्य झाले नाही. पण त्यावेळी त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेज जारी केला होता. इरफानने आपल्या या शेवटच्या ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून चाहत्यांना संदेश दिला होता. इरफान म्हणाला की, खरच, जेव्हा आयुष्य तुमच्या हातात लिंबु येते ना, त्यावेळी त्याचे सरबत करणे अत्यंत अवघड होऊन जाते. या परिस्थितीत मी लिंबाचा सरबत करू शकतो की, नाही ते तुमच्या हातात आहे.

इरफान खानचा शेवटचा ऑडिओ मेसेज :

Leave a Comment