वर्सोव्यातील दफनभूमीत इरफान खानवर अंतिम संस्कार


आपल्या बहुआयामी आणि दमदार भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता इरफान खानचे आज सकाळी निधन झाले. त्याच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीसह सगळ्यांनाच धक्का बसला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात इरफानचे चाहते होते. मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात इरफानचे निधन झाले. भारतात सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने इरफान खानच्या अंत्यदर्शनाला गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यात आली. त्याच पार्श्वभमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इरफानचे पार्थिव घरी न नेता थेट दफनभूमीत नेण्यात आले.

वर्सोवा येथील दफनभूमीत अतिशय शांततेत इरफानचे पार्थिव नेण्यात आले असून तिथे त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी न्यूज या वृत्त वाहिनीने दिले आहे. केवळ त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सध्या दफनभूमीत उपस्थित आहेत.

Leave a Comment