व्हिडीओ : ‘तेरी मिट्टी’ गाण्याच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्याने मानले कोरोना वॉरियर्सचे आभार

भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. या महामारीशी लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. या कोरोना वॉरियर्सची जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

या कोरोना वॉरियर्सप्रती असलेला सन्मान दर्शविण्यासाठी दिल्ली पोलीस दलातील कॉन्स्टेबल रजत राठोडने आपल्या सुंदर आवाजात अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे गायले. या गाण्याचा व्हिडीओ राठोड यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

A tribute from my side For all The heroes who are fighting with this pandemic🇮🇳 Doctors and force member salute to all of u 🙏🏼❤️ This song is one of My fav song Akshaykumar Bpraak#copthatsings #delhipolice #terimitti #tribute #bpraak #akshaykumar #kesari #parineetichopra #singer #indiansingers #brave #respect #dharmaproductions

Posted by Rajat Rathor on Sunday, April 26, 2020

व्हिडो शेअर करत त्यांनी लिहिले की, माझ्याकडून या महामारीशी लढणाऱ्या सर्व कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ. डॉक्टर्स आणि पोलीस दलातील सर्वांना सलाम. हे माझे आवडते गाणे आहे.

Image Credited – storypick

नेटकऱ्यांनी देखील राठोड यांच्या गाण्याचे कौतूक करत, सर्व कोरोना वॉरियर्सचे आभार मानले.

Leave a Comment