भारतातील या एसयूव्हींचा परदेशात होतो ‘पोलीस कार’ म्हणून वापर

भारतीय ऑटोमोबाईल कंपनींच्या कार्सची मागणी आता परदेशातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या कार्स आता परदेशातही लोकप्रिय होत आहे. काही भारतीय एसयूव्हींचा तर परदेशात पोलीस कार म्हणून वापर केला जातो. या एसयूव्हींविषयी जाणून घेऊया.

Image Credited – indianauto

महिंद्रा एक्सयूव्ही500 (दक्षिण आफ्रिका) –

भारतातील लोकप्रिय मिडसाईज एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही 500 दक्षिण आफ्रिकेत देखील लोकप्रिय आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात महिंद्राच्या अनेक कार्स आहेत. येथे महिंद्रा एक्सयूव्ही 500 चा वापर पोलीस दररोजच्या कामासाठी करतात.

Image Credited – indianauto

महिंद्रा स्कॉर्पियो गेटवे (इटली) –

महिंद्रा स्कॉर्पियो गेटवे भारतात खूप कमी लोकांनी खरेदी केली असली तरी इटलीमध्ये ही कार खूपच चालली. इटलीत ग्रुप ऑपरेशन दरम्यान पोलीस या कारचा वापर करतात.

Image Credited – carblogindia

महिंद्रा इंफोर्सेर (फिलिपाईन्स आणि भुतान) –

दक्षिण-पुर्व आशियाई देशांमध्ये महिंद्रा आजही महिंद्रा इंफोर्सेर अथवा बोलेरो कॅम्परची आजही विक्री करते. फिलिपाईन्स आणि भुतानमध्ये या एसयूव्हीचा वापर पोलीस दलासाठी केला जातो.

Image Credited – carblogindia

टाटा सफारी (अल्जेरिया) –

ही जुनी लोकप्रिय एयसूव्ही अल्जेरियामध्ये पोलिसांची मुख्य कार म्हणून वापरली जाते. टाटाने 2011 मध्ये अल्जेरिया मार्केटमध्ये इंडिका, इंडिगो, मांझा, अरिया आणि सफारीसह प्रवेश केला होता.

Image Credited – indianauto

महिंद्रा स्कॉर्पियो (फिलिपाईन्स, श्रीलंका आणि मालदीव) – 

स्कॉर्पियो आफ्रिका आणि दक्षिण-पुर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. फिलिपाईन्स, श्रीलंका आणि मालदीव या ठिकाणी पोलीस स्कॉर्पियोचा वापर करतात.

Leave a Comment