जिओमार्ट साठी ऑर्डर देताना ही खबरदारी घ्या


फोटो साभार नेक्स्ट वेब
रिलायंस जिओ आणि फेसबुक मध्ये नुकत्याच झालेल्या भागीदारी करारानुसार जिओमार्टची सुरवात झाली असून व्हॉटसअपवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर देऊन ग्राहक किराणा खरेदी करू शकणार आहेत. मात्र ही खरेदी करताना काही गोष्टीची खबरदारी जरूर घेतली गेली पाहिजे जेणेकरून या माध्यमातून खरेदी करताना फसविले जाण्याची भीती कमी होईल.

पहिली गोष्ट म्हणजे किराणा खरेदीची ऑर्डर व्हॉटसअपच्या माध्यमातून द्यायची आहे. म्हणजे त्यासाठी एखादे अॅप किंवा वेबसाईट अजून लाईव्ह नाही. ऑर्डर देताना ९१८८५०० ०८०००० ह नंबर सेव केला की एक लिंक मिळणार आहे. त्यावर क्लिक करून ऑर्डर द्यायची आहे. क्लिक करताना याच नावाशी साधर्म्य असलेल्या दुसऱ्या कुठल्या लिंकवर क्लिक केले जात नाहीना याची काळजी घ्यावी.

ऑर्डर देताना जी लिंक मिळणार आहे ती अर्धा तासच अॅक्टीव्ह राहणार आहे. त्यामुळे जरुरी सामानाची यादी अगोदर फोन मध्ये तयार करून मगच लिंकवर जा. अन्यथा लिंक बंद झाली तर पुन्हा सारी प्रक्रिया प्रथमपासून करावी लागणार आहे. फ्री डिलीव्हरी मिळणार असे सांगितले जात असले तरी होम डिलीव्हरी सुरु आहे की नाही याचा खुलासा केला गेलेला नाही. सध्या ही सेवा मुंबई, कल्याण आणि ठाणे या शहरात टेस्टसाठी सुरु केली गेली असून त्यावर काही निवडक वस्तूच मिळणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

Leave a Comment