सलमान खानचे अन्नदाता चॅलेंज


फोटो साभार जिओ टीव्ही
लॉक डाऊनच्या काळात बहुतेक सर्व व्यवसाय बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. या काळात घरबसल्या वेळ घालविण्यासाठी अनेक प्रकारची चँलेंज दिली घेतली जात असताना बॉलीवूड दबंग खान म्हणजे सल्लूभाईने अन्नदाता चँलेंज स्वीकारण्याची गळ लोकांना घातली आहे. यासाठी त्याने ट्विटरवर त्याच्या दोन जवळच्या मित्रांचे फोटो शेअर केले आहेत. बाबा सिद्दिकी आणि जीशान सिद्दिकी यांनी सुमारे १ लाख २५ हजार कुटुंबाना रेशन पुरविले आहे.

सलमानने हे फोटो शेअर करताना देशाच्या कोविड १९च्या अडचणीच्या काळात तुम्हीही या चँलेंजचा हिस्सा बना, अन्नदान करा असे आवाहन केले आहे. यासाठी स्वतः किंवा विश्वासू व्यक्तीची मदत घ्या असेही तो सुचवितो. स्वतः सलमानने काही दिवसांपूर्वी ट्रकभर अन्नपदार्थ रोजंदारी करणाऱ्या लोकांसाठी पाठविले होते तसेच त्याने फेडरेशनने यादी पाठविलेल्या १६ हजार मजुरांच्या खात्यात ४ कोटी ८० लाखाची रक्कम ट्रान्स्फर केली होती.

सलमानने त्याच्या ज्या दोन मित्रांचे अन्नदाता बनल्याबद्दल कौतुक केले आहे ते बाबा सिद्दिकी बांद्रा वेस्टचे आमदार आहेत तर झीशान त्याचाच मुलगा आहे.

Leave a Comment