फेरारीच्या एक कार चा नफा मिळविण्यासाठी फोर्डला विकाव्या लागतात 900 कार्स


फोटो साभार द सन
सुपरकार उत्पादक फेरारी कंपनी प्रत्येक विक्री झालेल्या कारमागे किमान 94 हजार डॉलर्स म्हणजे 70 लाख रुपये निव्वळ नफा कमावते असे एका अहवालात नमूद केले गेले आहे. फेरारी कार्स जगभर लोकप्रिय आहेत. अतिशय स्टायलिश आणि पॉवरफुल असलेल्या फेरारी दरवर्षी हजारोंच्या संखेने विकल्या जातात.

या कार्सविक्रीतून फेरारीला मिळणाऱ्या नफ्याबाबत प्रसिद्ध झालेला ताजा अहवाल सांगतो, फेरारीला एक कार मागे मिळणाऱ्या नफ्याची अन्य कंपनीच्या कार्स बरोबर तुलना केली तर असे म्हणता येईल फेरारीला एक कार मागे जितका नफा मिळतो तेवढा नफा मिळविण्यासाठी फोर्डला 900 कार्स विकाव्या लागतात. फेरारीला प्रत्येक कार मागे जो नफा मिळतो, त्याच्या जवळपास जगातील कोणतीच कार उत्पादक कंपनी जाऊ शकत नाही.

फेरारीला एका कार मागे मिळणारा नफा मिळविण्यासाठी बीएमडब्ल्यूला 30, टोयाटोला 44, वोल्वोला 45, फॉक्सवॅगनला 56, पीएसअला 65, मर्सिडीजला 67, कार्स विकाव्या लागतात. फेरारीने 2019 मध्ये 1031 कार्स विकल्या आहेत.

Leave a Comment