अशी आहे गेल्या ५१ दिवसातील ट्रम्प यांची कामगिरी


फोटो साभार भास्कर
बडे उद्योगपती आणि आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प प्रथमपासूनच बोलबच्चन म्हणून ओळखले जातात. अमेरिकेत उत्पात माजाविलेल्या कोविड १९ बद्दल ते व्हाईट हाउस मधून गेले काही दिवस ब्रीफिंग करत होते. अमेरिकेच्याच प्रसिद्ध न्युयॉर्क टाईम्समधील तीन पत्रकारांनी ट्रम्प यांनी या काळात उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचे विश्लेषण केले आहे. ९ मार्च पासून ते आजपर्यंत म्हणजे गेल्या ५१ दिवसांचे हे विश्लेषण आहे.

या विश्लेषणानुसार ट्रम्प यांनी या काळात २.६० लाख शब्द ब्रीफिंग करताना उच्चारले असून त्यात बरेच शब्द करोना संकट, त्यासंबंधीचे खोटे वादे, स्वतःची तारीफ, दुसऱ्याचे श्रेय स्वतः लाटणे, दुसऱ्यांवर आरोप यावर खर्च केले आहेत.

गेल्या २१ दिवसात त्यांनी १३ तास भाषण देण्यात घालविले असून त्यात दोन तास दुसऱ्यांवर आरोप, ४५ मिनिटे स्वतःची स्तुती, ३० मिनिटे डेमोक्रॅटिक सदस्यांना घेरणे, २५ मिनिटे मिडियावर सरबत्ती, २१ मिनिटे चीनवर हल्ले करण्यात आणि २२ मिनिटे गव्हर्नरची तारीफ करण्यात घालविले आहेत. या काळात ट्रम्प यांनी साडेचार मिनिटे करोना पिडीतांसाठी दिली असून स्वतःला महानायक म्हणवून घेण्यात यापेक्षा चौपट वेळ खर्च केला आहे.

Leave a Comment