सावधान ! एका मेसेजमुळे क्रॅश होऊ शकतो तुमचा आयफोन

टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपलचे उत्पादन असलेले आयफोन, अ‍ॅपल वॉच, आयपॅड अथवा मॅक हे एका टेक्स्ट मेसेजद्वारे क्रॅश होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. 9to5Mac च्या रिपोर्टनुसार, इटलीचा ध्वज असणारे इमोजी आणि सिंधी कॅरेक्टरद्वारे आयफोनसह अ‍ॅपलचे इतर उत्पादन क्रॅश होऊ शकतात. iOS13.4.1 वर चालणाऱ्या सर्व आयफोनमध्ये ही समस्या येत आहे.

रिपोर्टनुसार, सिंधी कॅरेक्टर आणि इटलीचा ध्वज असणाऱ्या इमोजीमुळे अनेकदा डिव्हाईस क्रॅश होत आहे. तर अनेकदा पुर्णपणे काम करणे बंद होत आहे. टच कंट्रोल काम न करण्याची देखील तक्रार येत आहे. अ‍ॅपलने या बगला फिक्स करण्यासाठी  iOS 13.4.5 अपडेट जारी केले आहे. मात्र सध्या हे केवळ बीटा व्हर्जनसाठीच आहे.

आयमॅसेजसह ट्विटर, फेसबुक आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर हे इमोजी शेअर केले जात आहेत. जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत हे इमोजी आल्यास फोनला रीबूट करावे, जेणेकरून डिव्हाईस क्रॅश होणार नाही.

Leave a Comment