दिल्ली पोलिसांच्या ‘त्या’ परिक्रमेचे मोदींकडून कौतूक

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिल्लीतील बंगला साहीब गुरुद्वारा देखील मदत करत आहे. त्यांच्या या मदतीचे आभार मानण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सायरन वाजवत गुरुद्वारा बंगला साहीबची परिक्रमा केली. पंतप्रधान मोदींनी देखील याचा व्हिडीओ शेअर करत दिल्ली पोलिसांचे आणि कोरोनाशी लढण्यासाठी मदत करणाऱ्या देशभरातील गुरुद्वारांचे कौतूक केले.

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे व यामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. अशात देशभरातील गुरुद्वारा हे गरजूंना जेवायला देत आहेत. दिल्लीतील बंगला साहीब हे दररोज 75 हजार जणांना जेवण देत आहे.

पंतप्रधान मोदींनी या संदर्भात ट्विट केले की, लोकांची मदत करण्यासाठी गुरुद्वारा प्रशंसनीय काम करत आहेत. त्यांचे कृत्य नक्कीच कौतूकास्पद आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डेप्यूटी कमिश्नर ईश सिंघाल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा दुचाकी आणि चारचाकीद्वारे गुरुद्वाराला परिक्रमा घालत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी जेवण बनविण्यासाठी देखील मदत केली.

दरम्यान, याआधी देखील गुरुद्वाराने आपली जागा हॉस्पिटलसाठी दिली होती, जेणेकरून कोरोनाग्रस्तांसाठी त्याचा वापर होईल.

Leave a Comment