पृथ्वीवर आले होते एलियन ? अमेरिकेने शेअर केले यूएफओ व्हिडीओ

अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने अधिकृतरित्यात 3 अनआयडेंटिफाईड एरियल फिनोमिना अर्थात यूएफओचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अमेरिकाचा सुरक्षा विभाग पेंटागनने सांगितले की, हे व्हिडीओ नौदलाच्या पायलटने 2004 आणि 2005 मध्ये काढले आहेत व 2007 आणि 2017 मध्ये लीक झाल्यापासून इंटरनेटवर पसरत आहेत.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अज्ञात प्लाईंग वस्तू स्क्रीनवर सलग हालत आहे. व्हिडीओ फूटेजमध्ये यूएफओ ड्रोन असल्याची शक्यता आहे, असा देखील आवाज येत आहे.

हे व्हिडीओ शेअर केल्यानंतर इंटरनेटवर यूएफओबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ट्विटरवर #UFOs देखील ट्रेंड होत आहे. या संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे.

तपासणीनंतर हे स्पष्ट आहे की असे काहीही घडलेले नाही, ज्याची मिलिट्री एअर स्पेसमध्ये अज्ञात हवाई घटनेची चौकशी व्हावी. लोकांमधील गैरसमज दुर व्हावेत, यासाठी हे व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे पेंटागनने म्हटले आहे.

Leave a Comment