पैशांअभावी अडकलेल्या प्रवासी कामगारांना ही व्यक्ती देत आहे मोफत बँकिंग सेवा

लॉकडाऊनमुळे देशभरात परराज्यात कामासाठी गेलेले हजारो कामगार अडकले आहेत. मुंबईपासून 60 किमी अंतरावरील वसई येथे देखील हजारो परप्रांतीय कामगार अडकले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांकडे कमाईचा कोणताच मार्ग नाही. इतरांनी दिलेल्या मदतीवरच सध्या ते दिवस काढत आहे.

या कामगारांच्या मदतीसाठी पैसे ट्रांसफर करण्याचा व्यवसाय चालवणारे 45 वर्षीय जॉन पेरेरिया पुढे आले आहेत. ज्या लोकांना बँके सेवा वापरता येत नाही, मात्र पैशांची गरज आहे, अशा लोकांची जॉन मदत करतात.

जॉन यांनी सांगितले की, जवळपास 90 टक्के कामगार, प्लबंर आणि इलेक्ट्रिशियन हे स्थलांतरित कामगार आहेत. या लोकांनी आधार कार्डच्या मदतीने बँक खाते तर उघडले आहे. मात्र त्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही व त्यांना पैसे कसे काढायचे हे देखील माहीत नाही.

जॉन हे या कामगारांना आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमच्या मदतीने त्यांच्या खात्यातून पैसे काढून देण्यास मदत करतात. या कामासाठी जॉन कोणतेही कमिशन देखील घेत नाही.

लॉकडाऊननंतर जॉन यांनी आपला व्यवसाय अत्यावश्यक सुविधेत असल्याचे सांगत परवानगी सुरू ठेवण्याची परवानगी मिळवली आहे. ते सकाळी 4-5 तास आणि संध्याकाळी 4-5 तास दुकान उघडे ठेवतात व या कामगारांना पैसे काढण्यासाठी मदत करतात. त्यांना बँकेकडूनच थेट 4.50 रुपये कमिशन मिळते.

जॉन यांनी सांगितले की, दुकान सुरू ठेवत असल्याने घरच्यांकडून विरोध होत आहे. ते माझ्या सुरक्षेबाबत काळती व्यक्त करतात. मात्र या लोकांना आता माझी सर्वाधिक गरज आहे.

अनेकदा सिस्टममधील पैसे संपल्यानंतर जॉन स्वतःच्या खात्यातून पैसे देण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत. एवढेच नाहीतर ते आपली सेवा सतत सुरू राहील याची देखील काळजी घेतात. या संदर्भात द बेटर इंडियांने वृत्त दिले आहे.

Leave a Comment