या नव्या पिढीच्या स्टार्सने दिला होता ‘हंगामा 2’ ला नकार, दिग्दर्शकाने सांगितले कारण

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन हे लवकरच आपला 2003 चा लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘हंगामा’चा सिक्वल आणणार आहे. हंगामा 2 या चित्रपटात अभिनेता मिझान जाफरी दिसणार आहे. मात्र आपण या चित्रपटासाठी आयुषमान खुराना, कार्तिक आर्यन या सारख्या अभिनेत्यांशी देखील संपर्क साधला होता, मात्र त्यांच्यातील कोणीही या प्रोजेक्टमध्ये रस दाखवला नसल्याचे प्रियदर्शन यांनी सांगितले आहे.

प्रियदर्शन म्हणाले की, मी थेट त्यांना भेटायला गेलो नाही. मात्र चित्रपटाची कॉन्सेप्ट आयुषमान खुराणा, कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारख्या अभिनेत्यांसमोर मांडली होती. मात्र त्यांनी यास नकार दिला. आता मी मिझानसोबत काम करत आहे. त्या सर्वांनी नकार दिला, कदाचित त्यांना मी कालबाह्य झालो आहे, असे वाटत असेल. कारण मी हिंदी चित्रपटसृष्टीपासून मागील 5 वर्षांपासून लांब होतो.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक असलेले प्रियदर्शन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हिंदी, तामील, तेलगू, मल्याळम या सारख्या भाषांमध्ये 95 पेक्षा अधिक चित्रपट केले आहेत. यामध्ये विरासत, हेरा फेरी, हंगामा, हलचल, चुप चुप के, भूल भुलैय्या या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

प्रियदर्शन म्हणाले की, मला त्या अभिनेत्यांबरोबर काम करण्यास आवडते जे माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यांना कदाचित यात रस नव्हता. त्यांनी थेट मला नकार दिला नाही. मला अभिनेत्यांकडे भीक मागायला आवडत नाही आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात अशांबरोबर काम करण्यास प्राधान्य देतो.

याशिवाय त्यांनी सांगितले की, हंगामा 2 च्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी ते खूश आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट असेल, मात्र कथा वेगळी आहे. 80 टक्के चित्रपट पुर्ण झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र कोरोना व्हायरसमुळे काही चित्रीकरण बाकी आहे.

2003 च्या हंगामा चित्रपटात परेश रावल, शोमा आनंद, अक्षय खन्ना, आफताब शिवदसानी आणि रिमी सेन मुख्य भूमिकेत होते. तर हंगामा 2 मध्ये मिझान, शिल्पा शेट्टी, प्रणिता सुभाष आणि परेश रावल दिसणार आहेत.

Leave a Comment