आनंद महिंद्रांना का डिलीट करावे लागले ‘हे’ ट्विट

उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ट्विटरवर आपल्या फॉलोअर्ससाठी ते अनेक वेगवेगळे व्हिडीओ, प्रेरणादायी स्टोरी शेअर करत असतात. मात्र सध्या त्यांना एका ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

नुकताच आनंद महिंद्रा यांनी एका बाळाचा आपल्या आईसोबतच फोटो शेअर केला होता. यात दोघांनी मास्क म्हणून झाडाचे पान तोंडाला लावले होते. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, हा फोटो कोरोना व्हायरसच्या काळातील नक्कीच एक आयकॉनिक फोटो ठरेल.

Image Credited – scoopwhoop

मात्र नेटकऱ्यांना त्यांचे हे ट्विट आवडले नाही व त्यांनी महिंद्रा यांच्या असंवेदनशीलपणावर प्रश्न उपस्थित केले.

कॉमेडियन आदिती मित्तलने देखील यावर लिहिले की, यात साजरे करण्यासारखे काहीच नाही. उलट यात सरकारचे अपयश दिसून येते. जे त्यांना मास्क उपलब्ध करून देऊ शकत नाही.

अखेर या ट्विटवर ट्रोल करण्यात आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट हटवले. यासोबत दिलगिरी व्यक्त करत त्यांनी लिहिले की, बरोबर आहे. मी समजू शकतो की माझे ट्विट या विषमतेच्या स्थितीमध्ये किती असवंदेशनील आहे. मी ते डिलीट केले आहे.

Leave a Comment