कोरोना लसीसाठी चीनचा अमेरिकेवर सायबर हल्ला ?

चीनने कोरोना व्हायरसची माहिती जगापासून लपवल्याचा आरोप अमेरिकेने अनेकदा केला आहे. मात्र अमेरिकेने आता चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

अमेरिकेचे म्हणणे आहे की चीनने त्यांची कोरोना व्हायरसवरील लसी संदर्भातील माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एजेंसी आणि मेडिक संस्थांवरील सायबर हल्ल्यात वाढ होत आहे. हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हाईडर आणि फार्मा कंपन्यांवर याचा परिणाम होत आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजवर दररोज सायबर हल्ले होत आहेत. केवळ चीन आणि रशिया असा हल्ला करू शकतात. या हल्ल्यांसाठी चीन संशयित आहे.

राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रमुख जॉन डेमर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसवरील लसीसाठी बायोमेडिकल रिसर्चपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. जो देश, कंपनी अथवा लॅब सर्वात प्रथम लस बनवेल त्याला जिओपॉलिटिकल यश मिळेल.

अमेरिकेने चीन, रशिया, ईराण आणि उत्तर कोरियावर सायबर हल्ल्याचा आरोप अनेकदा केला आहे. हे हल्ले बनावट ईमेलद्वारे डाटा चोरी करणे, सर्व्हिस थांबवणे आणि रॅनसमवेयर अटॅकसाठी केले जातात.

Leave a Comment